Champions Trophy Final 2025 : ICC फायनलमधील न्यूझीलंडची आकडेवारी भारताला धडकी भरवणारी, जाणून घ्या रेकॉर्ड्स?

New Zealand’s record in ICC tournament finals : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा कारवां अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. हा सामना दुबईच्या मैदानावर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अपराजित राहून जेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला आहे. त्याच वेळी, न्यूझीलंडला साखळी फेरीत फक्त भारताकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे दोन्ही संघात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी न्यूझीलंडचा फायनलमधील रेकॉर्ड जाणून घेऊया.
२००० मध्ये पहिल्यांदाच अंतिम सामना खेळला होता –
खरं तर, न्यूझीलंड संघाने आतापर्यंत एकूण ६ आयसीसी स्पर्धेत सात फायनल खेळल्या आहेत. ज्यामध्ये त्यांना चारमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडने दोन्ही फायनल भारताविरुद्ध आहेत. २००० मध्ये न्यूझीलंड संघाने पहिल्यांदाच आयसीसीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत भारताचा चार विकेट्सनी पराभव केला होता. त्यावेळी भारताचे नेतृत्व सौरव गांगुली आणि न्यूझीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग करत होते. त्यानंतर, पुढील दोन आयसीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला.
२०२१ मध्ये भारताविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनल जिंकली –
कांगारूंनी २००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आणि २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात किवी संघाविरुद्ध विजय मिळवला यानंतर. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या रोमांचक अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता आणि बाउंड्री काउंट बॅक नियमानुसार इंग्लंडने विजय मिळवला.
त्याच वेळी, २०२१ मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. त्यावेळी विराट कोहली भारताचे नेतृत्व करत होता. किवी संघाने २०२१ मध्ये शेवटचा आयसीसी फायनल खेळला होता. त्यावेळी, टी-२० विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ विकेट्सने पराभव केला होता. उद्याच्या फानलनलमध्ये भारताला रोहित शर्माकडून खूप अपेक्षा आहे.





