NZ vs AFG : भारत दौऱ्यावर येणाऱ्या न्यूझीलंड संघाची घोषणा…! 9 सप्टेंबरपासून कसोटी, अफगाणिस्तानशी होणार सामना…

NZ vs AFG One-off Test : न्यूझीलंड संघाला भारतात येऊन पुढील महिन्यात अफगाणिस्तान संघाविरुद्ध कसोटी सामना खेळायचा आहे. या एकमेव कसोटी सामन्यासाठी किवी संघाची घोषणा करण्यात आली आहे. 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक कॉम्प्लेक्समध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी आणि श्रीलंकेविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. टीम साऊदीच्या नेतृत्वाखाली किवी संघ अफगाणिस्तान संघाविरुद्ध खेळणार आहे. मायकल ब्रेसवेल 18 महिन्यांनंतर कसोटी संघात परतला आहे.
पुढील महिन्यात 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडने सोमवारी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला. अफगाणिस्तान संघ भारतात न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. या एकमेव कसोटी सामन्यासाठी नोएडातील स्टेडियम सज्ज करण्यात आले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी खेळल्यानंतर न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. येथे किवी संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत दोन कसोटी सामने खेळायचे आहेत.
ब्रेसवेल 18 महिन्यांनंतर परतला…
मायकेल ब्रेसवेल 18 महिन्यांनंतर न्यूझीलंड कसोटी संघात परतला आहे. अफगाणिस्तान विरुद्ध भारतामध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटीसाठी मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि रचिन रवींद्रसह ऑफस्पिनर ब्रेसवेलचा समावेश करण्यात आला आहे. किवी कर्णधार टीम साऊदीकडेही ग्लेन फिलिप्सच्या रूपाने पाचवा फिरकीचा पर्याय असेल. फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम, केन विल्यमसन, रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
The squad covers the one-off Test against @ACBofficials in India and two ICC World Test Championship against @OfficialSLC in Sri Lanka next month.
Read more | https://t.co/RB8qXPJuDS #AFGvNZ #SLvNZ pic.twitter.com/pKoxwtKFqF
— BLACKCAPS (@BLACKCAPS) August 12, 2024
न्यूझीलंड कसोटी संघ : टीम साऊदी (कर्णधार), टॉम ब्लंडेल, केन विल्यमसन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओ’कोर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, विल यंग.
अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी सामना भारतात का…?
साल 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट सुरू झाली. राजकीय अस्थिरता आणि युद्धाच्या भीषणतेचा सामना करणाऱ्या आणि सरावासाठी स्वतःचे मैदानही नसलेल्या देशाच्या संघाने टी-20 विश्वचषकात चांगली कामगिरी केली. क्रिकेटच्या पायाभूत सुविधाही तिथे नाहीत. काबूलमध्ये एकच जागतिक दर्जाचे मैदान आहे. मात्र आतापर्यंत येथे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही.
या पार्श्वभूमीवर आणि तालिबान सरकार आल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध तीनदा खेळण्यास नकार दिला आहे. महिलांना खेळांमध्ये सहभागी होण्यापासून रोखणाऱ्या तालिबानच्या धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने ही भूमिका घेतल्याचे जाहीर केले होते. पण ऑस्ट्रेलियाचा शेजारी देश न्यूझीलंडने हा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवत अफगाणिस्तानशी खेळण्यास होकार दिला आहे.
AFG vs NZ : बीसीसीआयचा पुन्हा एकदा अफगाणिस्तानला मदतीचा हात, ग्रेटर नोएडासह ‘या’ दोन शहरातील….
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानच्या प्रवासात भारत आणि बीसीसीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच बीसीसीआयनं अफगाणिस्तानला आपले सामने आयोजित करण्यासाठी ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक कॉम्प्लेक्स हे मैदान दिले आहे. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक कॉम्प्लेक्समध्ये खेळवला जाईल. बीसीसीआयने ग्रेटर नोएडासह कानपूर आणि लखनौ येथील मैदाने अफगाणिस्तान संघाचे होम ग्राऊंड म्हणून घोषित केले आहे.





