New Zealand Squad : चौथ्या वनडेत भारताला रोखण्यासाठी न्यूझीलंडची मोठी खेळी! ३१ वर्षांच्या अनकॅप्ड खेळाडूला दिली थेट पदार्पणाची संधी
New Zealand Squad : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना १३ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. न्यूझीलंडने शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला असून, त्यात नवीन खेळाडूंचा समावेश आहे.

IND vs NZ 4th 5th ODI New Zealand ODI Squad India Series Brett Randell Josh Clarkson : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चौथा सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतलेल्या भारताविरुद्ध अखेरच्या दोन सामन्यांसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपला सुधारित संघ जाहीर केला आहे. प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींनी ग्रासलेल्या किवी संघाने सततच्या बदलांदरम्यान ३१ वर्षीय अनुभवी देशांतर्गत गोलंदाज ब्रेट रँडेलला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय संघात संधी दिली आहे. उद्या, १३ नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ७:३० वाजता चौथ्या वनडेत दोन्ही संघ आमनेसामने येतील.
ब्रेट रँडेल आणि जोश क्लार्कसनची संघात दमदार एन्ट्री –
न्यूझीलंडने जाहीर केलेल्या संघात ३१ वर्षीय वेगवान गोलंदाज ब्रेट रँडेलचा समावेश लक्षवेधी ठरला आहे. रँडेलने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही; मात्र नुकत्याच झालेल्या कौंटी चॅम्पियनशिपमध्ये डर्बीशायरकडून चमकदार कामगिरी केल्याने त्याला पदार्पणाची संधी मिळणार आहे. याशिवाय, एप्रिल महिन्यापासून संघाबाहेर असलेल्या अष्टपैलू जोश क्लार्कसनलाही पाचव्या वनडेत पाचारण करण्यात आले असून त्याने आतापर्यंत ६ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
भारताला मालिका विजयाची संधी, तर न्यूझीलंडसमोर बरोबरीचे आव्हान –
Welcoming in Brett Randell for his maiden BLACKCAPS call-up 👏
Full squad update HERE – https://t.co/zSPRjIcVK0
📸 @PhotosportNZ https://t.co/4GXR9dzCRb
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 11, 2026
पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-० ने आघाडीवर असून तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे किवी संघाचे मालिका विजयाचे स्वप्न भंगले असले, तरी उर्वरित दोन्ही सामने जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया चौथा सामना जिंकून मालिका विजयानर शिक्कामोर्तब करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, ख्रिश्चन क्लार्क, जेकब डफी, मॅट फिशर, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिच हे (यष्टिरक्षक), मॅट हेन्री, काईल जेमिसन, निक केली, ब्रेट रँडेल, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), विल यंग.
पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, ख्रिश्चन क्लार्क, जोश क्लार्कसन, जेकब डफी, मॅट फिशर, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिच हे (यष्टिरक्षक), निक केली, ब्रेट रँडेल, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), ब्लेअर टिकनर, विल यंग.





