न्यूयॉर्क पोलिसांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची गाडी अडवली, लगेच ट्रम्प यांना फोन; नेमकं काय घडलं… पहा व्हिडीओ

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या 80व्या महासभेच्या (UNGA) निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये सध्या जवळपास 200 देशांचे राष्ट्रप्रमुख, सरकारप्रमुख, मंत्री आणि हजारो राजनयिक एकत्र आले आहेत. या काळात कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे एक रंजक घटना घडली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या गाडीला न्यूयॉर्क पोलिसांनी अडवल्याने त्यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन लावला.
प्राप्त माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यामुळे न्यूयॉर्कमधील एक रस्ता बंद करण्यात आला होता. यामुळे मॅक्रॉन यांच्या अधिकृत वाहनाला काही वेळ थांबावे लागले. थोड्या प्रतीक्षेनंतर मॅक्रॉन स्वतः गाडीतून उतरले आणि ट्रम्प यांना फोन करून रस्ता मोकळा करण्याची विनंती केली. अहवालानुसार, या दोन नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली. ट्रम्प यांनी तात्काळ रस्ता खुला करण्याचे आदेश दिले.
New York police stopped French President Macron’s motorcade because the road was closed for Trump.
Macron got out, called Trump, and jokingly asked him to “clear the road.” pic.twitter.com/PYIWd2r92s— Yeshi Seli (@YeshiSeli) September 23, 2025
मॅक्रॉन यांचा मोठा निर्णय: फिलिस्तीनला स्वतंत्र राष्ट्राची मान्यता –
या घटनेनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. फ्रान्स आता फिलिस्तीनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देईल, अशी घोषणा त्यांनी केली. हा निर्णय मध्य-पूर्वेतील राजकारणात महत्त्वाचा ठरत असून, याचा परिणाम अमेरिकेसह इतर मोठ्या देशांच्या धोरणांवर होऊ शकतो.





