New Year Celebration : नववर्षाच्या स्वागतावेळी चोख बंदोबस्त; सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. 8 अप्पर पोलिस आयुक्त, 29 पोलिस उपायुक्त, 53 सहाय्यक पोलिस आयुक्त, 2184 पोलिस अधिकारी आणि 12 हजार 48 पोलिस अंमलदार गस्तीवर असणार आहेत, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. शहरातील महत्वांच्या चौकात नाकाबंदी ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई पोलीस सक्षम आहेत. जगातील सुरक्षित शहर म्हणून मु़ंबईची ओळख आहे. ती प्रतिमा पोलिस कायम ठेवतील हा विश्वास असल्याचे योगेश कदम म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनला सुरक्षेबाबत सूचना दिलेल्या आहेत. नव वर्षाच्या सुरक्षेसाठी 12 हजार अंमलादार असतील तर महिला पोलिसही आहेत. नव वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी कोणतेही दडपण बाळगू नये. पोलीस आपल्या सुरक्षेसाठी तयार आहेत, असे कदम म्हणाले. ड्रग्जचे सेवन खासगी पार्टीत मोठ्या प्रमाणात होते आहे, त्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचे कदम म्हणाले.
ड्रग्ज पार्टींवर कडक कारवाई होणार आहे. मद्यपान करुन वाहने चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम सुरू राहणार आहे. 800 गाडया जप्त केल्या आहेत, काही महिन्यात सर्वच जबाबदारी पोलिसांवर टाकून चालणार नाही. नागरिकांनही जबाबदारीने वागले पाहिजे, असे रेव्ह पार्टी किंवा इतर गुप्त पार्टींवर एटीसी व अंमली पदार्थ विभागाचे पोलिस लक्ष ठेवून राहतील.





