Team India Full Schedule 2025 : टीम इंडियाचा नवीन वर्षात पहिला सामना कोणाशी असेल? जाणून घ्या, संपूर्ण वेळापत्रक…

Team India Full Schedule 2025 : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले. आता तिसरी कसोटी 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवली जाणार आहे.
भारतीय संघ नव वर्षाच्या सुरूवातील ऑस्ट्रेलियातच राहणार आहे. नवीन वर्षात त्याची पहिली कसोटी फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्धच होणार आहे. पण भारतीय संघाचा 2025 वर्षातील पहिला एकदिवसीय आणि पहिला टी20 सामना हा इंग्लंड विरुद्ध होणार आहे. टीम इंडिया 2024 चा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये खेळणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. यानंतर नवीन वर्ष सुरू होईल. टीम इंडिया 3 ते 7 जानेवारी दरम्यान सिडनीमध्ये मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी खेळणार आहे. 2025 मधील हा त्याचा पहिला सामना असेल. यानंतर टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
जानेवारीत भारत दौऱ्यावर येणार इंग्लंडचा संघ…
खरंतर, इंग्लंड क्रिकेट संघ जानेवारी 2025 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. त्याचा पहिला सामना 22 जानेवारीला कोलकाता येथे होणार आहे. या मालिकेतील शेवटचा टी-20 सामना 2 फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना नागपुरात 6 फेब्रुवारीला तर शेवटचा वनडे 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.
नववर्षातील भारताचे सुरूवातीचे कसोटीचे वेळापत्रक…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 5 वी कसोटी – सिडनी (जानेवारी 3 ते 7,2025)
(भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथा कसोटी सामना 30 डिसेंबर रोजी संपणार आहे)
नवीन वर्षात टीम इंडियाचे टी-20 वेळापत्रक…
भारत विरुद्ध इंग्लंड – पहिला T20 सामना – 22 जानेवारी
भारत विरुद्ध इंग्लंड – दुसरा T20 सामना- 25 जानेवारी
भारत विरुद्ध इंग्लंड – तिसरा T20 सामना – 28 जानेवारी
भारत विरुद्ध इंग्लंड – चौथा T20 सामना- 31 जानेवारी
भारत विरुद्ध इंग्लंड – पाचवा T20 सामना- 02 फेब्रुवारी
नवीन वर्षात टीम इंडियाचे वनडे वेळापत्रक….
भारत विरुद्ध इंग्लंड – पहिली वनडे – 06 फेब्रुवारी
भारत विरुद्ध इंग्लंड – दुसरी वनडे – 09 फेब्रुवारी
भारत विरुद्ध इंग्लंड – तिसरी वनडे – 12 फेब्रुवारी





