सोनिया गांधी यांना ईडीचे नव्याने समन्स
Updated On:

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नव्याने समन्स बजावले. आता त्यांना चौकशीसाठी 23 जूनला हजर होण्यास सांगण्यात आले आहे.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने सोनियांना याआधीच समन्स बजावले होते. त्यांना 8 जूनला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी सोनियांना करोनाबाधा झाली. त्यामुळे त्यांनी ईडीपुढे हजर होण्यास आणखी अवधी मागितला. त्यानुसार, ईडीने सोनियांच्या चौकशीसाठी नवी तारीख दिली आहे.
संबंधित प्रकरणात ईडीने सोनियांचे पुत्र आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनाही समन्स बजावले आहे. त्यानुसार, राहुल 13 जूनला ईडीपुढे हजर होणार आहेत. सोनिया आणि राहुल यांच्या विरोधातील प्रकरण बनावट आणि निराधार असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे.





