भाजप खासदार बांसुरी स्वराज यांना न्यायालयाने बजावली नोटीस ; सत्येंद्र जैन यांनी केला ‘हा’ आरोप

Bansuri Swaraj Notice। दिल्लीतील भाजप खासदार बांसुरी स्वराज यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने फौजदारी मानहानीची नोटीस बजावली आहे. आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांच्या याचिकेवर बांसुरी स्वराज यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
सत्येंद्र जैनविरुद्व अपमानास्पद टिप्पणी Bansuri Swaraj Notice।
सत्येंद्र जैन यांनी 5 ऑक्टोबर 2023 रोजी एका वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान बांसुरी स्वराज यांनी त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणी न्यायालयाने स्वराज यांना ही नोटीस पाठवली असल्याचे सांगण्यात येत आहे.
20 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस Bansuri Swaraj Notice।
बांसुरी स्वराज यांना 20 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की बांसुरी स्वराज वैयक्तिकरित्या हजर राहू शकतात किंवा त्यांच्या वतीने त्यांचे वकील हजर राहू शकतात. 20 डिसेंबर रोजी न्यायालयात सत्येंद्र जैन आणि त्यांच्या दोन साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातील.
हेही वाचा
बहादुर शाहच्या वारसाची ‘ती’ याचिका फेटाळली ; याचिकेत केली होती ‘ही’ महत्वपूर्ण मागणी





