अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ चित्रपटातील नवं गाणं रिलीज

Akshay Kumar | अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘स्काय फोर्स’ या चित्रपटासाठी खूप चर्चेत आहे. अक्षयसोबत या चित्रपटात निम्रत कौर, वीर पहारिया आणि सारा अली खान देखील आहेत. हा चित्रपट 24 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या आधी प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘स्काय फोर्स’ मधील ‘रंग’ हे गाणं प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरलं आहे. या गाण्यामध्ये अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांच्या नृत्याची जुगलबंदी पाहून प्रेक्षक त्यांचे कौतुक करत आहेत. हे गाणे पार्टीतील असून ज्याला देसी शैली देण्यात आली आहे.
या गाण्यात अक्षय त्याच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत आहे. यापूर्वी अक्षयने निम्रत सोबत एअरलिफ्ट या चित्रपटातही काम केले आहे. यावेळी दोघांची केमिस्ट्री खूप आवडली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यास सज्ज झाली आहे. यात सारा अली खान वीर पहारियासोबत दिसणार आहे.
View this post on Instagram
‘स्काय फोर्स’ सिनेमा १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. या सिनेमात अक्षय कुमार एअर फोर्स अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. अक्षयसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. कारण, याआधी त्याचे जवळपास 9 चित्रपट फ्लॉप झाले होते. Akshay Kumar |
अशा परिस्थितीत हवाई हल्ल्यावर आधारित ‘स्काय फोर्स’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. एक काळ असा होता की सारा अली खान आणि वीर पहाडिया एकमेकांना डेट करायचे. मात्र आता दोघे चांगले मित्र आहेत. या चित्रपटात दोघेही पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे ही जोडी कितपत जमणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Akshay Kumar |
हेही वाचा:
टीकेला प्रतिउत्तर देण्यापेक्षा कृतीतून उत्तर देणे गरजेचे… : अभिनेत्री सीमा बिस्वास





