‘पुष्पा २’मधील नवीन गाणं रिलीज; अल्लू अर्जुन आणि श्रीलीलाच्या जोडीने घातला धुमाकूळ

Pushpa 2 Song Kissik Out | अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2′ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रिलीज होण्याआधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर दुसऱ्या भागाकडून देखील प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. याचदरम्यान यावर्षीच्या बहुप्रतिक्षित चित्रपटातील ‘किसिक’ हे गाणेही अखेर रिलीज झाले आहे. या गाण्यातील अल्लू अर्जुन आणि दक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला यांच्या केमिस्ट्रीने खळबळ उडवून दिली आहे.
‘पुष्पा’मधली ‘ऊ अंटावा’ गाण्यावरील समांथाचा डान्सनंतर दुसऱ्या भागातील आयटम साँगबाबतही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. अखेर या गाण्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. या गाण्यात दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला आणि अल्लू अर्जुन यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ‘पुष्पा २’चं ‘किसिक’ गाणं चेन्नईत एका भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आलं. या गाण्याला अवघ्या काही तासातच लाखोंचे व्ह्यूज आले. Pushpa 2 Song Kissik Out |
पुष्पा 2 या जबरदस्त गाण्यात, श्रीलीलाने तिच्या बोल्ड एनर्जी, सौंदर्याने आणि दमदार नृत्याने सर्वांना प्रभावित केले आहे. तर, अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पराजच्या भूमिकेत त्याच्या जबरदस्त शैली आणि दमदार डान्स मूव्हसह परतला आहे. Pushpa 2 Song Kissik Out |
दरम्यान, चेन्नईमधील या सोहळ्याला अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानासह श्रीलीला सुद्धा उपस्थित होती. गाण्याच्या रिलीज इव्हेंटला प्रमुख कलाकारांसह चित्रपटाच्या निर्मात्यांनीही उपस्थिती लावली होती. हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:





