नवा नियम : आता हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास तुरुंगवास तसेच 5000 रुपयांचा दंडही होणार

Updated On:
नवा नियम : आता हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास तुरुंगवास तसेच 5000 रुपयांचा दंडही होणार

सध्या प्रत्येकजण मोबाईल वापरतो. बस किंवा ट्रेन, लोकलमध्ये प्रवास करताना आपण अनेकदा मोबाईलमध्ये व्यस्त असतो. पण काही लोक असे आहेत जे बस, ट्रेन आणि सार्वजनिक ठिकाणी फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. फोनवरही जोरात बोलतात. अशा लोकांसाठी मोबाईल वापराबाबत एक नवा नियम आला आहे, ज्यामध्ये तुम्ही बसमध्ये प्रवासादरम्यान फोनवर मोठ्याने बोलल्यास किंवा हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला 5000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच, 3 महिन्यांची शिक्षादेखील होऊ शकते

* मुंबईत नवीन नियम लागू
सध्या हा नियम (नवीन मोबाईल नियम) बेस्ट अर्थात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने लागू केला आहे. या नियमांतर्गत बसमध्ये हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहण्यावर बंदी घालण्यात आली असून, नियम मोडल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.

बेस्टने या आठवड्यापासून मोबाईलच्या स्पीकरवर व्हिडिओ पाहण्यास किंवा गाणी वाजविण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना 25 एप्रिल रोजी जारी करण्यात आली होती. नव्या नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी बसेसमध्ये सूचना चिकटविण्याचे काम सुरू झाले आहे. हा नवा नियम मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील बस प्रवाशांना लागू होणार आहे.

* नवीन नियम का आणण्यात आला ?
मोबाइल फोनबाबत नवा नियम आणण्यामागचे कारण म्हणजे ध्वनी प्रदूषण. यासोबतच बस प्रवाशांच्या गैरसोयीपासून वाचण्यासाठी नवा नियम आणण्यात आला आहे. नव्या परिपत्रकानुसार आवाजाची डेसिबल पातळी कमी ठेवण्यासाठी नवा नियम आणण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही बस प्रवाशाला फोनवर मोठ्याने बोलू दिले जाणार नाही. तुम्हाला संगीत ऐकायचे असल्यास, हेडफोन सोबत घेऊन जाणे अधिक चांगली कल्पना आहे.

आणखी संबंधित बातम्या

Central Goverment: LPG नियमात पुन्हा बदल ; पाईप गॅस कनेक्शन असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

2026-05-26 14:14:24

Central Goverment: LPG नियमात पुन्हा बदल ; पाईप गॅस कनेक्शन असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Ear Health Tips: इयरफोनची सवय ठरतेय घातक; WHOचा इशारा दुर्लक्षित करू नका

2026-04-27 14:52:49

Ear Health Tips: इयरफोनची सवय ठरतेय घातक; WHOचा इशारा दुर्लक्षित करू नका

Benjamin Netanyahu Death Rumours: मोजतबा खामेनी यांच्यानंतर नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या ; वाचा इस्रायलने काय म्हटले ?

2026-03-15 13:28:11

Benjamin Netanyahu Death  Rumours: मोजतबा खामेनी यांच्यानंतर नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या ; वाचा इस्रायलने काय म्हटले ?

Mumbai News : बीएमसीची मोठी कारवाई ! उड्डाणपुलाच्या बांधकामास विलंब झाल्याने कंत्राटदाराला 50 लाखांचा दंड

2026-02-18 19:28:50

Mumbai News : बीएमसीची मोठी कारवाई ! उड्डाणपुलाच्या बांधकामास विलंब झाल्याने कंत्राटदाराला 50 लाखांचा दंड

Delhi High Court : सतत याचिका दाखल केल्याने दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला ठोठावला दंड

2025-12-18 17:12:16

Delhi High Court : सतत याचिका दाखल केल्याने दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला ठोठावला दंड