Central Goverment: LPG नियमात पुन्हा बदल ; पाईप गॅस कनेक्शन असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
Central Goverment: सध्या एलपीजी सिलेंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल होत असल्याचे दिसत आहे.

Central Goverment: सध्या एलपीजी सिलेंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल होत असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारने नागरिकांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी नियमांमध्ये सुधारणा केली आहे. विशेषतः ज्यांनी गॅस पाईपलाईन अर्थात पीएनजी कनेक्शन घेतले आहे, त्या ग्राहकांना अधिक सुलभ सेवा देणे हा या बदलामागील मुख्य उद्देश आहे.
सरकारचा LPG बाबत मोठा निर्णय (Central Goverment)
केंद्र सरकारने काल “लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (पुरवठा आणि वितरण नियमन) सुधारणा आदेश, २०२६” हा निर्णय घेतला होता. ज्या ग्राहकांकडे PNG कनेक्शन आहे, त्यांना त्यांच्याकडचे LPG कनेक्शन परत करणं आता बंधनकारक केलं जाणार नाही. हा मोठा निर्णय नागरिकांसाठी आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी खूप महत्वाचा असणार आहे.
आताच नियम बदलण्याचे कारण काय? (Central Goverment)
सध्याच्या मध्य पूर्वेतल्या ताणामुळे सिलेंडरच्या किमतीमध्येही वाढ करण्यात आली होती. तसेच LPG सिलेंडर देण्याचा कालावधीही वाढवण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना अनेककाळ संताप सहन करावा लागला होता. त्यातच केंद्र सरकारने ही महत्वाची माहिती दिली.
सरकारकडून विशेष मदत
केंद्र सरकारने पीएनजी कनेक्शनसाठीच्या अर्जांवर सात दिवसांच्या आत प्रक्रिया करण्याचे आदेश जारी केले आहेत. जर तुम्हाला पीएनजी कनेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला जास्तीच्या सुविधा देण्याची योजना सरकार प्लान करत आहे.
LPG चे नवीन नियम
आता नवीन नियमांनुसार LPG ग्राहकांकडे २ ऑप्शन असतील. जर तुम्ही PNG कनेक्शन घेतलं , तर तुम्ही ३० दिवसांच्या आत तुमचं LPG कनेक्शन बंद करण्यासाठी अर्ज करू शकतात. दुसरा ऑप्शन म्हणजे, तुम्ही भविष्यात LPG कनेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी ट्रान्सफर व्हाउचर मिळवू शकतात.
सरकारच्या मते, या नियमांचा फायदा जे लोक रोजगार, शिक्षण किंवा इतर कारणांसाठी सतत वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थलांतरित होतात. तिथे पीएनजी सेवा उपलब्ध नसतात. त्यांच्यासाठी याचा फायदा होणार आहे.






