पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी ; ‘या’ राज्यात 26 जानेवारीपासून पेट्रोलवर सबसिडी

नवी दिल्ली – भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल चे नव्याने दर जारी केले आहेत. देशभरात आज म्हणजेच, 16 जानेवारी 2022 रोजीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशांतर्गत पातळीवर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
त्यानंतरही महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश यांच्यासह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपये प्रति लिटर पार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून देशाची राजधानी दिल्ली आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
झारखंडमध्ये 26 जानेवारीपासून पेट्रोल-डिझेलवर मिळणार सबसिडी
झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राशन कार्ड धारकांसाठी 26 जानेवारी 2022 पासून एका ठराविक मर्यादेपर्यंत प्रति लिटर पेट्रोलवर 25 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे.
सोरेन यांनी 26 जानेवारीपासून गरिबांना पेट्रोल खरेदीवर प्रतिलिटर 25 रुपये अनुदान देण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील शिधापत्रिकाधारक दुचाकी चालकांना पेट्रोल खरेदीवर प्रतिलिटर 25 रुपये सवलत मिळणार आहे. मात्र ही सबसिडी किती दिवस असणार हे अद्याप निश्चित नाही.
देशात सर्वात स्वस्त पेट्रोल कुठल्या शहरात?
देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेयरमध्ये पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लिटरने विकले जाते. तर
राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावर लावण्यात येणाऱ्या व्हॅटच्या (VAT) वेगवेगळ्या दरांमुळे राजस्थानमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल विकलं जात आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल (Petrol) 112 रुपये प्रति लिटर आहे.





