सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेल दरवाढ
Updated On:

नवी दिल्ली -सार्वजनिक इंधन कंपन्यांनी बुधवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 19 पैशांची, तर डिझेलच्या दरात 21 पैशांची वाढ केली. त्यामुळे दोन्ही इंधनांच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली.
आता दिल्लीत पेट्रोलचा दर 90 रुपये 74 पैसे, तर मुंबईत 97 रुपये 12 पैसे इतका झाला आहे. दिल्लीत डिझेल 81 रुपये 12 पैशांना, तर मुंबईत 88 रुपये 19 पैशांना मिळेल. नवी दरवाढ संपूर्ण देशासाठी लागू आहे.





