नेवासा फाटा येथे नवीन पोलीस मदत केंद्र; नागरिकांना सुरक्षा, गुन्हेगारीला आळा!

नेवासा : नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात नव्याने सुरू झालेल्या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (11 एप्रिल) सायंकाळी 7 वाजता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, उपनिरीक्षक विजय भोंगे, शैलेंद्र ससाणे, सरपंच दादा निपुंगे, पोलीस पाटील आदेश साठे, अॅड. बाळासाहेब कावळे, पत्रकार राजेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.
या केंद्रामुळे स्थानिक आणि पंचक्रोशीतील नागरिकांना तक्रार नोंदवणे, मार्गदर्शन आणि तातडीची मदत मिळणे सोपे होईल. तसेच, गुन्हेगारी रोखण्यात आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना मोठा हातभार लागेल. केंद्रात तक्रार नोंदणी, विशेष कक्ष आणि आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. नागरिक आणि व्यावसायिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.




