‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये होणार नव्या सोनू भिडेची एन्ट्री

Taarak Mehta ka Ooltah Chashmah | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानी हिने नुकताच या शोचा निरोप घेतला. आता या शोमध्ये सोनू भिडेची भूमिका साकारण्यासाठी नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री खुशी माली आता पलकऐवजी सोनूची भूमिका साकारताना दिसणार आहे.
7 ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये खुशीची एंट्री झाली. मात्र, जेव्हा निर्मात्यांनी सोशल मीडियावर नवीन सोनू भिडेबद्दल सांगितले तेव्हा लोकांनी नाराजी व्यक्त केली आणि हा शो आता थांबवावा असे सांगितले. शोच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर नवीन सोनू भिडे म्हणजेच खुशी माळीची ओळख करून देणारा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओवरून लोकांनी मेकर्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली. Taarak Mehta ka Ooltah Chashmah |
View this post on Instagram
खुशी माली चौथी अभिनेत्री
सोनू भिडेची भूमिका करणारी खुशी माली ही चौथी अभिनेत्री आहे. यापूर्वी सोनू भिडेची भूमिका अभिनेत्री झील मेहता (2008-2012), निधी भानुशाली (2012-2019) आणि पलक सिंधवानी (2019-2014) यांनी साकारली आहे. पलक सिंधवानीने अलीकडेच कायदेशीर वादामुळे शो सोडला आहे. Taarak Mehta ka Ooltah Chashmah |
कोण आहे खुशी माली?
खुशी मालीने याआधी ‘साझा सिंदूर’ या मालिकेत काम केले होते. अभिनयात काम करण्यापूर्वी ती मॉडेलिंग करत होती. खुशी सोशल मीडियावरही सक्रिय असते. दरम्यान, आता तिला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये प्रेक्षकांची पसंती मिळणार का? हे पहावे लागणार आहे. Taarak Mehta ka Ooltah Chashmah |
हेही वाचा:
सावरिया मधील रणबीर कपूरचा अभिनय पाहून संजय लीला भन्साळी,’रडले’





