satara | करंजेतील न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के

सातारा, (प्रतिनिधी) – करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल सलग सहाव्या वर्षी शंभर टक्के लागला आहे. पियुष जनार्दन जाधव (92.40 टक्के), वैष्णवी गणेश जाधव (92 टक्के),
शर्विल राहुल जाधव (90.80 टक्के), श्रेयस हणमंत कुचेकर (90.80 टक्के), रेहान नजीम बागवान (88.20 टक्के), आर्यन रोहिदास जाधव (88.20 टक्के), पृथ्वीराज अभयसिंह कोकीळ (86.80 टक्के) यांनी विद्यालयात पहिले पाच क्रमांक मिळवले.
विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य, संस्थेचे सचिव तुषार पाटील आणि स्कूल कमिटी चेअरपर्सन सौ. प्रतिभा चव्हाण यांच्या अचूक नियोजनामुळे 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली गेली आहे. संस्थेच्या अध्यक्ष सौ. वत्सला डुबल,
उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, संचालिका सौ. हेमकांची यादव, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीलम शिंदे, पर्यवेक्षिका कु. दीपाली कदम, पीआरओ सौ. मंजुषा किरकिरे, संचालक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





