दुचाकी चालकांच्या डोक्यावर नवे ओझे; आता हेल्मेटचे मानांकनही आवश्यक
Updated On:

नवी दिल्ली – दुचाकीस्वार वापरत असलेले हेल्मेट भारतीय दर्जा मानांकन कायदा संस्थेने (बीआयएस) प्रमाणित केले असावे, अशी सूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केली आहे.
या सूचनेवर अंलबजावणी सुरू झाल्यानंतर स्थानिक बनावटीचे हेल्मेट वापरणाऱ्यांना चलन फाडावे लागणार आहे. बीआयएसने मानांकित केलेलेच हेल्मेट दुचाकी चालकांना भारतात वापरता येणार आहे. त्यामुळे स्थानिक हेल्मेट उत्पादकांना कारावासाची आणि दंडाची शिक्षा भोगावी लागू शकते.
या नव्या बदलांमुळे हेल्मेटच्या दर्जात सुधारणा होईल. त्यामुळे रस्ते अपघातात मरण पावणाऱ्या दुचाकी चालकांच्या संख्येत घट होईल, असे या मंत्रालयाने म्हटले आहे.
या सूचनेबाबत मंत्रालयाने सामान्य नागरिक आणि संबंधितांकडून सूचनाही मागवल्या आहेत. त्या 30 दिवसांत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





