GOOD NEWS : सप्टेंबरमध्ये येणार दुसरी कोरोना प्रतिबंधक लस
Updated On:

मुंबई – कोविशिल्डनंतर सीरम इन्स्टिट्यूट भारतीयांना आणखी एक कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या तयारीत आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्विटरवरून याबाबत घोषणा केली आहे. या लसीची ट्रायल भारतात सुरू झाली असून सप्टेंबरपर्यंत ही लस भारतात येईल, असा दावाही अदर पूनावाला यांनी केला आहे.
अमेरिकी कंपनी नोव्हावॅक्ससोबत भागीदारीने सीरम कोव्होवॅक्स लसीची भारतात निर्मिती करणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी असणारी लस भारतात आलेली नव्हती. नवे स्ट्रेन हे भारतात लसी आल्यानंतर आढळू लागले होते. मात्र कोव्होवॅक्स ही लस आफ्रिकन आणि ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनवरही 89 टक्के प्रभावी असल्याचं अदर पूनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.





