मदतीचे मोल कधीही विसरू नका : प्रा. साळुंखे
Updated On:

आपल्या सगळ्यांना पूर्व- पश्चिम- उत्तर- दक्षिण या दिशा माहिती आहेत. पण आधुनिक समाजामध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी दिशा परिवार ही पाचवी दिशा काम करत आहे, असे मत श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे यश संवाद विभागाचे प्रमुख प्रा. देविदास साळुंखे यांनी व्यक्त केले. शिक्षणाची जिद्द आहे पण पैसा नाही, अशा विद्यार्थ्यांना दैनिक प्रभात व दिशा परिवार करीत असलेली मदत ही अनमोल आहे.
हे मोल कधीही विसरू नका. मिळालेल्या मदतीतून खूप शिका, आपल्या शिक्षणात खंड पडू देऊ नका, मदत मिळाली म्हणजे संपले असे न करता त्या मदतीतून शिक्षणाचा खर्च भागवा, तसेच आपण मोठे व यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्यांना देखील मदत करण्यास विसरू नका, असे प्रा. साळुंखे म्हणाले.





