प्रभात वृत्तसेवा नेवासे – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या माथेफिर वकिलावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी दुपारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने नेवासा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. या मोर्चामध्ये दलित चळवळीतील सर्व संघटना सहभागी झालेल्या होत्या. प्रारंभी हा निषेध मोर्चा नेवासे बसस्थानकापासून शांततेच्या मार्गाने नेवासे पोलीस ठाण्यावर आणण्यात आला. यावेळी भीमसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत सरन्यायाधीशांवर भ्याड हल्ला करणाऱ्या माथेफिरू वकील राकेश किशोर याच्या प्रतिमेला चप्पल व बुटाने तुडवित निषेध नोंदविला. यावेळी दलित चळवळीचे नेते अॅड.संजय सुखधान, रिपाइंचे तालुकाध्यक्ष सुशिल धायजे, शहराध्यक्ष पप्पूभाऊ इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे, संपर्क प्रमुख विजय राजगुरू,घटनापती ग्रूपचे रवी भालेराव, युवकाध्यक्ष संतोष कासोदे, गवई गटाच्या शहराध्यक्षा ज्योती पवार, सारिका साळवे, सोनाली पवार, माजी सभापती पावलस गोर्डे, माजी जि. प. सदस्य दिलीप सरोदे, डॉ.गणेश डांगे, पप्पू कांबळे, विजय गायकवाड, पास्टर सुर्या गजभीव, अॅड.राजेंद्र पंडीत, प्रभाकर खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. नेवासे बसस्थानक येथून शांततेच्या मार्गाने पोलीस ठाण्यावर आणण्यात आलेल्या मोर्चाचे रुपांतर निषेध सभेत झाले. अॅड.संजय सुखधान यांनी आमचा माणूस शिकून सर्वोच्च पदावर पोहचलेला असताना तेच जर सुरक्षित नसतील तर देशातील सर्वसामान्य दलित माणूस कसा सुरक्षित असेल ,असा सवाल उपस्थित केला. आता आम्हाला शिक्षणाबरोबर स्व:संरक्षणार्थ शस्र हातात घ्यावे लागतील असा इशारा देत या घटनेचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी किशोर बोर्गे, मेजर अशोकराव काळे,अमोल घुले, संतोष मकासरे, स्वप्निल सोनकांबळे, सागर हिवाळे, अशोक राजगुरू, देविदास राजगुरू, भाऊसाहेब जगदाळे, भास्करराव लिहीणार, योगेश गायकवाड, प्रविण सरोदे, सुभाष इंगळे, माऊली गोरे, पत्रकार राजेंद्र वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने दलित चळवळीतील पदाधिकारी आणि भीमसैनिक उपस्थित होते.पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि नेवासे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.