भारती सिंहला थायलँडला फिरायला गेल्याने नेटकऱ्यांनी केले ट्रोल; रडत-रडत दिले स्पष्टीकरण

Bharti Singh | कॉमेडियन भारती सिंह पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एकीकडे भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचं वातावरण असताना भारती परदेशात फिरायला गेली आहे. यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे तिचे कुटुंबीय अमृतसरमध्ये तणावात असताना भारती परदेशात फिरायला गेल्याने तिच्यावर टीका केली जात आहे. मात्र यानंतर भारतीने रडत रडत तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे.
या व्लॉगमध्ये भारती म्हणते, “देशात सध्या तणावाचं वातावरण असलं तरी माझे कुटुंबीय सुरक्षित आहेत. मला माझ्या देशावर आणि सरकारवर पूर्ण विश्वास आहे. भारत एक मजबूत राष्ट्र आहे आणि त्याला कोणीच धक्का पोहोचवू शकत नाही. जेव्हा मी तुमचे कमेंट्स वाचते, तेव्हा मला राग येत नाही. मला इतकंच वाटतं की तुम्ही खूप भोळे आहात. मी सर्वांना हे स्पष्ट करू इच्छिते की मी थायलँडला एका कामासाठी आली आहे. इथे मी सुट्ट्यांचा आनंद घ्यायला आले नाही. आमच्याकडे दहा दिवसांचं शूटिंग होतं आणि या प्रोजेक्टसाठी आम्ही तीन-चार महिन्यांपूर्वीच होकार दिला होता. त्यामुळे कामाप्रती असलेली वचनबद्धता आम्हाला पाळावी लागेल. त्यासाठी बरीच तयार झाली होती, पैसे खर्च झाले होते.” Bharti Singh |
या व्हिडीओमध्ये बोलताना भारतीला अश्रू अनावर होतात. “मला माझ्या देशाची आणि कुटुंबाची पर्वा नाही, असे कमेंट्स नेटकरी करतात. परंतु दिवसातून दोन ते तीन वेळा मी त्यांच्याशी संपर्क साधून सर्वकाही अपडेट्स जाणून घेत असते. खोट्या बातम्या वाचून मी सुद्धा अस्वस्थ होते. मलाही खूप रडायला येतं. मी अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहात… मी पुन्हा हेच सांगू इच्छिते की मला माझ्या देशावर आणि सरकारवर पूर्ण विश्वास आहे. या कठीण काळात सुद्धा माझे कुटुंबीय मला प्रेरणा देत आहेत”, असं ती म्हणते. याशिवाय व्हिडिओच्या शेवटी भारतीने तिच्या चाहत्यांना घाबरू नका आणि सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करा, अशी विनंती केली आहे. Bharti Singh |
हेही वाचा :
Pune Gramin : सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात आढळले दोन रानगवे; परिसरात खळबळ





