Gaurav Khanna : आकांक्षाने गौरव खन्नाची तुलना थेट श्वानासोबत केल्याने नेटकरी संतापले
Gaurav Khanna : आकांक्षानं गौरव खन्नाच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली

Gaurav Khanna : अभिनेत्री आकांक्षा चमोला ( Akanksha Chamola )’लॉक अप सीझन २’च्या सीझनमध्ये सातत्याने नवे खुलासे करत आहे. आता पुन्हा एकदा आकांक्षाने केलेल्या एका वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तिचा पती आणि प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना याच्या शोमधील भेटीबद्दल बोलताना आकांक्षानं त्याला अनोळखी व्यक्ती म्हणून संबोधलं आणि त्याच्याऐवजी कुटुंबातील कोणी किंवा पेट डॉग आला असता तरी चाललं असतं, असं म्हटलं. यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
शोमध्ये जेव्हा स्पर्धक धीरज धूपरची पत्नी विन्नी अरोरा आणि इतर कुटुंबीय भेटायला आले, तेव्हा कौटुंबिक भेटींबद्दल चर्चा सुरू होती. यावेळी सह-स्पर्धक श्रेया कालरा आणि शिल्पा शिंदे यांच्याशी संवाद साधताना आकांक्षाने गौरव खन्नाच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली. आकांक्षांने आपल्या पतीची तुलना थेट श्वानासोबत केल्यामुळे प्रेक्षक आणि गौरव खन्नाचे चाहते प्रचंड संतापले आहेत. ( Gaurav Khanna)
अनेकांनी तिला आकांक्षा एक ‘फेम डिगर’ असल्याचे म्हंटले आहे. तसेच ‘गौरव खन्नाच्या नावाचा वापर करून फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी ती शोमध्ये आली आहे’, असेही नेटकरी म्हणत तिच्यावर टीका करत आहे.
नेमकं काय म्हणाली आकांक्षा? (Gaurav Khanna)

Gaurav Khanna : आकांक्षाने गौरव खन्नाची तुलना थेट श्वानासोबत केल्याने नेटकरी संतापले
आकांक्षा म्हणाली की, गौरव माझ्यासाठी नाही, तर स्वतःसाठी आला होता. माझ्यासाठी तर तो ‘एक्स’ आणि स्ट्रेंजरसारखाच आहे. त्याच्या ऐवजी माझ्या कुटुंबातील दुसरं कुणी आलं असतं, तर मला बरं वाटलं असतं, कम्फर्ट मिळाला असता. माझी आई, वडील किंवा माझा पाळीव कुत्रा जरी आला असता, तरी मला जास्त आनंद झाला असता. तिच्या या वक्तव्यानंतर शोमधील इतर सदस्य हसू लागले असले, तरी बाहेर सोशल मीडियावर मात्र यावरून तिच्यावर टीका केली जात आहे. ( Gaurav Khanna)
हेही वाचा:
Wet Phone Tips: पावसात फोन भिजला? घाबरू नका! या ‘७’ सोप्या टिप्स पाळा आणि वाचवा आपला महागडा फोन





