Wet Phone Tips: पावसात फोन भिजला? घाबरू नका! या ‘७’ सोप्या टिप्स पाळा आणि वाचवा आपला महागडा फोन
Wet Phone Tips फोन बंद केल्यानंतर त्यावरील बॅक कव्हर किंवा प्रोटेक्टिव्ह केस काढून टाका. त्यामुळे आत अडकलेला ओलावा बाहेर पडण्यास मदत होते. त्यानंतर सिम कार्ड आणि मेमरी कार्ड बाहेर काढा. जर तुमच्या फोनमध्ये काढता येणारी बॅटरी असेल तर तीही लगेच वेगळी करा.

Wet Phone Tips: पावसाळ्यात अचानक पाऊस सुरू होणे किंवा फोन हातातून पाण्यात पडणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र अशा वेळी घाईघाईत केलेली एक छोटी चूक तुमचा महागडा स्मार्टफोन(SmartPhone) कायमचा खराब करू शकते. अनेकजण फोन भिजल्यानंतर तो लगेच सुरू करून पाहतात, चार्जिंगला लावतात किंवा तांदळाच्या डब्यात ठेवतात. पण तज्ज्ञांच्या मते या सवयी फोनसाठी अधिक धोकादायक ठरू शकतात.
फोन पाण्यात भिजल्यानंतर सर्वात पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे तो त्वरित स्विच ऑफ करणे. जर फोन आधीच बंद असेल तर तो चालतोय का हे पाहण्यासाठी अजिबात सुरू करू नका. फोनच्या आत पाणी शिरलेले असताना वीजपुरवठा सुरू झाला तर शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे मदरबोर्ड किंवा इतर महत्त्वाचे भाग खराब होऊ शकतात. (Wet Phone Tips)
फोन बंद केल्यानंतर त्यावरील बॅक कव्हर किंवा प्रोटेक्टिव्ह केस काढून टाका. त्यामुळे आत अडकलेला ओलावा बाहेर पडण्यास मदत होते. त्यानंतर सिम कार्ड आणि मेमरी कार्ड बाहेर काढा. जर तुमच्या फोनमध्ये काढता येणारी बॅटरी असेल तर तीही लगेच वेगळी करा. (Wet Phone Tips)

Wet Phone Tips
यानंतर स्वच्छ, कोरड्या आणि मऊ कापडाने फोनची स्क्रीन, बाजू आणि मागील भाग हलक्या हाताने पुसून घ्या. फोन जोरात हलवू नका. त्याऐवजी चार्जिंग पोर्ट खाली राहील अशा पद्धतीने धरून हलकेच टॅप करा. त्यामुळे पोर्ट किंवा स्पीकरमध्ये अडकलेले पाणी बाहेर पडण्यास मदत होते. (Wet Phone Tips)
फोन भिजल्यानंतर काही गोष्टी अजिबात करू नयेत. सर्वात मोठी चूक म्हणजे फोन लगेच चार्जिंगला लावणे. चार्जिंग पोर्ट ओला असताना वीज गेल्यास स्पार्क होऊन चार्जिंग सिस्टीम खराब होऊ शकते. (Wet Phone Tips)
अनेकजण फोन लवकर सुकावा म्हणून हेअर ड्रायर वापरतात. पण हा उपायही चुकीचा आहे. ड्रायरमधून येणारी गरम हवा फोनमधील नाजूक प्लास्टिकचे भाग खराब करू शकते. तसेच हवेच्या दाबामुळे पाणी आणखी आत जाऊ शकते.
सोशल मीडियावर भिजलेला फोन तांदळाच्या डब्यात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि अनेक स्मार्टफोन कंपन्यांच्या मते हा उपाय योग्य नाही. तांदळातील बारीक कण आणि स्टार्च चार्जिंग पोर्ट, स्पीकर किंवा इतर छिद्रांमध्ये अडकू शकतात. त्यामुळे फोन दुरुस्त होण्याऐवजी अधिक खराब होण्याची शक्यता असते.
जर फोन पाण्यात जास्त वेळ राहिला असेल किंवा योग्य प्रकारे सुकल्यानंतरही सुरू होत नसेल, तर स्वतः प्रयोग न करता अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये नेणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. वेळेत योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास अनेकदा फोन मोठ्या नुकसानीपासून वाचू शकतो.





