T20 World Cup 2024 : नेदरलँडचा संघ जाहीर, ‘या’ दोन दिग्गज खेळाडूंना मिळाला डच्चू…

T20 World Cup 2024 (Netherlands Squad) : नेदरलँड्सने 2024 च्या T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केला आहे. संघाने स्कॉट एडवर्ड्सला कर्णधार बनवले आहे. आर्यन दत्त आणि बास डी लीडे हे देखील संघात आहेत. नेदरलँडचा संघ बराच संतुलित दिसत आहे. त्यांनी अनुभवी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंनाही संधी दिली आहे. पण नेदरलँड संघानं दोन दिग्गज खेळाडूंना संघाबाहेर ठेवले आहे. अष्टपैलू रॉल्फ व्हॅन डर मर्वे (Roelof van der Merwe) आणि कॉलिन अकरमन यांना संधी देण्यात आलेली नाही.
नेदरलँडचा संघ स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. एडवर्ड्स हा अनुभवी खेळाडू असून त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. त्याने 18 टी-20 आंतरराष्ट्रीय डावात 671 धावा केल्या आहेत. एडवर्ड्सने 47 एकदिवसीय डावात 1512 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 15 अर्धशतके केली आहेत. बास डी लीडे देखील संघाचा भाग आहे. अष्टपैलू म्हणून त्याने चांगली कामगिरी केली आहे. लीडेने 31 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 610 धावा केल्या आहेत. यासोबतच 27 विकेट्सही घेतल्या आहेत.
नेदरलँड्सने एकरमैनला संघात स्थान दिलेले नाही. एकरमैनने या वर्षी एप्रिलमध्ये प्रथम श्रेणी सामन्यात शतक झळकावले होते. हरारे येथे एका देशांतर्गत टी-20 सामन्यात त्याने 90 धावांची इनिंग खेळली. यानंतर त्याने 52 धावांची खेळी खेळली. मात्र, असे असतानाही संघाने अकरमनवर विश्वास व्यक्त केला नाही. संघाने मर्वेला संधीही दिलेली नाही. त्याचा एकूण रेकॉर्ड चांगला राहिला आहे. मात्र 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी मेरवे नेदरलँड संघात स्थान मिळवू शकला नाही. रॉल्फ व्हॅन डर मर्वे (Roelof van der Merwe) याने 57 टी20 सामन्यात 490 धावा केल्या आहेत तर गोलंदाजीत 60 विकेट घेतल्या आहेत. कॉलिन एकरमैन याने संघासाठी 22 सामने खेळले आहेत. त्यामध्ये फलंदाजीत 465 धावा तर गोलंदाजीत 7 विकेट घेतल्या आहेत.
IPL 2024 Final : विजेतेपदाची लढत कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या, किती असेल सर्वात स्वस्त तिकीट…
नेहमीच मोठ्या संघांसाठी ठरला आहे डोकेदुखी…
नेदरलँड संघाला कमी लेखून चालणार नाही. कारण या संघाने T20 विश्वचषक 2009 मध्ये इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला होता. तर T20 विश्वचषक 2014 मध्येही इंग्लंडचाच 45 धावांनी पराभव केला होता. 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचासुध्दा 13 धावांनी पराभव केला होता. यामुळे स्पर्धेत अनेक मोठ्या संघाची डोकेदुखी वाढली होती.
🚨 𝗡𝗲𝘁𝗵𝗲𝗿𝗹𝗮𝗻𝗱𝘀 𝘀𝗾𝘂𝗮𝗱 🚨 For ICC Men’s T20 World Cup 2024
Get ready to cheer for #kncbrcicket #T20WorldCup #Cricket #OutOfThisWorld #kncbsquad #NORDEK pic.twitter.com/zCQL7vKKn3
— Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) May 13, 2024
टी-20 विश्वचषक 2024 साठी नेदरलँड संघ : स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/यष्टीरक्षक), आर्यन दत्त, बास डी लीडे, डॅनियल डोरम, फ्रेड क्लासेन, काइल क्लेन, लोगान व्हॅन बीक, मॅक्स ओ’डॉड, मायकेल लेविट, पॉल व्हॅन मीकरेन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, तेजा निदामनुरु, टिम प्रिंगले , विक्रम सिंग , विव किंगमा , वेस्ली बॅरेसी.





