Netflix Free Trial: नेटफ्लिक्सचा 30 दिवसांचा फ्री ट्रायल परत आला? काही नव्या यूजर्सना मिळत आहे खास ऑफर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Netflix Free Trial गेल्या काही वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सने फ्री ट्रायलची सुविधा बंद केली होती. मात्र, आता काही वापरकर्त्यांना पुन्हा अशी ऑफर दिसत असल्याने सोशल मीडियावर याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

Netflix Free Trial: ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिज पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काही नव्या नेटफ्लिक्स (Netflix) वापरकर्त्यांना 30 दिवसांचा मोफत ट्रायल मिळत असल्याचे समोर आले आहे. काही यूजर्सना खाते तयार करताना “Try 30 days for ₹0” असा पर्याय दिसत आहे, तर काहींना 15 दिवसांचा फ्री ट्रायल ऑफर मिळत आहे. मात्र, नेटफ्लिक्सने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे ही सुविधा सध्या सर्वांसाठी उपलब्ध नसून निवडक नव्या वापरकर्त्यांसाठीच असल्याचे मानले जात आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सने फ्री ट्रायलची सुविधा बंद केली होती. मात्र, आता काही वापरकर्त्यांना पुन्हा अशी ऑफर दिसत असल्याने सोशल मीडियावर याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. त्यामुळे ही मर्यादित स्वरूपातील चाचणी (Testing) असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
फ्री ट्रायल कसा सुरू करायचा?
जर तुमच्या नेटफ्लिक्स अकाउंटवर हा पर्याय उपलब्ध असेल, तर तो सक्रिय करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
सर्वप्रथम नवीन नेटफ्लिक्स अकाउंट तयार करा. ही ऑफर जुन्या अकाउंटसाठी लागू होत नाही. साइन-अप करताना “Try 30 days for ₹0” किंवा त्यासारखा पर्याय दिसल्यास त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला हवा असलेला सबस्क्रिप्शन प्लॅन निवडा. पुढे UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डची माहिती भरावी लागेल. ट्रायल कालावधीत कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. साइन-अप पूर्ण झाल्यानंतर तुम्ही नेटफ्लिक्सवरील चित्रपट, वेब सीरिज आणि इतर कंटेंटचा आनंद घेऊ शकता.

Netflix
ऑटो रिन्यूअलची काळजी घ्या
फ्री ट्रायल घेताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ट्रायल कालावधी संपल्यानंतर तुमचे सबस्क्रिप्शन आपोआप सुरू होऊ शकते आणि निवडलेल्या पेमेंट पद्धतीतून शुल्क आपोआप कापले जाऊ शकते. त्यामुळे ट्रायल संपण्यापूर्वी AutoPay बंद करणे किंवा सबस्क्रिप्शन रद्द करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील बिलिंग सायकलचे पैसे आपोआप कापले जाऊ शकतात.
काहींना 30 दिवस, तर काहींना 15 दिवसांचा ट्रायल का?
काही रिपोर्ट्सनुसार, सर्व वापरकर्त्यांना समान ऑफर मिळत नाही. काही नव्या यूजर्सना 30 दिवसांचा ट्रायल मिळत आहे, तर काहींना फक्त 15 दिवसांची सुविधा दिसत आहे. काही जणांनी VPN वापरून दुसऱ्या देशातून नवीन अकाउंट तयार केल्यास 30 दिवसांचा ट्रायल दिसू शकतो, असा दावा केला आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा वापर टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा
ही ऑफर सध्या केवळ काही नव्या वापरकर्त्यांनाच दिसत आहे. नेटफ्लिक्सने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. कंपनी मर्यादित स्तरावर या ऑफरची चाचणी घेत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ऑफर उपलब्ध आहे की नाही, याची खात्री नेहमी नेटफ्लिक्सच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरच करावी.
जर तुम्ही नेटफ्लिक्सचे नवीन वापरकर्ते असाल, तर खाते तयार करताना ही ऑफर उपलब्ध आहे का, हे एकदा नक्की तपासा. ऑफर मिळाल्यास आवडत्या चित्रपटांचा आणि वेब सीरिजचा मोफत आनंद घेण्याची ही चांगली संधी ठरू शकते. मात्र, ट्रायल संपल्यानंतर अनावश्यक शुल्क लागू नये, यासाठी AutoPay आणि सबस्क्रिप्शनची माहिती वेळेवर तपासणे तितकेच महत्त्वाचे आहे.





