नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतु चंद्र कुमार बोस यांनी मोदींना लिहिले पत्र

कोलकाता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतु चंद्र कुमार बोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये त्यांनी पंतप्रधानांना आपल्या आजोबांचे पार्थिव भारतात परत आणण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून ते त्यांच्यांवर आपल्या हिंदू परंपरेनुसार अंतिम संस्कार करू शकतील. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहीले असल्याचे समोर आले आहे.
केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आतापर्यंत तीन चौकशी आयोग स्थापन केले होते. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. नेताजी बोस यांच्या मृत्यूबद्दल अनेक अफवा पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे नेताजी यांच्या मृत्यूबाबत केंद्र सरकारनेही निवेदन द्यावे, अशी मागणी चंद्र कुमार बोस यांनी केली आहे.
बोस म्हणाले, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशीत झालेल्या संदर्भावरून 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींचा मृत्यू झाला हे स्पष्ट होते. माझे नम्र आवाहन आहे की, नेताजींचे पार्थिव रेनकोजी येथून १८ ऑगस्ट २०२४ पर्यंत भारतात परत आणावे. तसेच त्यांच्या मृत्यूच्या अफवांबाबत भारत सरकारकडून अंतिम विधान करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून खोट्या कथनांना आळा बसेल, असेही बोस यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.





