Pune : नेट परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध
Updated On:

पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) १० जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (युजीसी नेट) हॉल तिकीट प्रसिद्ध केले आहे.
ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे, ते आता एनटीए युजीसी नेटच्या अधिकृत वेबसाइटवरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.
त्यासाठी अधिकृत वेबसाइटवर अर्ज क्रमांक, जन्मतारीख वापरून लॉग इन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





