Ness Wadia Statement : ‘पंजाबमध्ये वेगळा हार्दिक पाहायला मिळेल अन् भविष्यात अर्शदीप पुनरागमन…’, पंजाब किंग्सचे सहमालक नेस वाडियांचे मोठे वक्तव्य
Ness Wadia Statement on Hardik Pandya : पंजाब किंग्स संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी पहिल्यांदाच हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडवर प्रतिक्रिया दिली आहे.

Ness Wadia Hardik Pandya Statement : पंजाब किंग्समध्ये नव्या भूमिकेत आणि वेगळ्या अंदाजात हार्दिक पंड्या पाहायला मिळेल, असा विश्वास संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी व्यक्त केला. हार्दिक आणि फ्रँचायझी दोघेही दीर्घकालीन उद्दिष्टाने काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. हार्दिकच्या आगमनामुळे संघातील समीकरणे बिघडण्याची शक्यताही त्यांनी फेटाळली.
तो श्रेयस-पॉन्टिंगला मदत करेल – नेस वाडिया
आयपीएलमधील मोठ्या ट्रेडमध्ये पंजाबने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या बदल्यात मुंबई इंडियन्सकडून हार्दिकला संघात घेतले. या व्यवहारानंतर पीटीआयशी बोलताना वाडिया म्हणाले, “हार्दिक आपला अनुभव आणि क्रिकेटमधील शहाणपण संघासोबत वाटून घेण्यास उत्सुक आहे. मैदानावर तो कर्णधार श्रेयस अय्यरला, तर मैदानाबाहेर प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगला पाँटिंगला मदत करेल.”
तो लढाऊ खेळाडू असून भविष्यात तंदुरुस्त राहील – वाडिया
VIDEO | Punjab Kings co-owner Ness Wadia has promised a long association with premier India all-rounder Hardik Pandya and the franchise, saying “we’re definitely in it for the long term and so is he”.
After completing one of the biggest trades in IPL history, Wadia said they needed a player like Hardik to take the team to a long-awaited title. He also insisted that Hardik will have no issues playing under Shreyas Iyer despite the former’s rich captaincy experience in the IPL.
“We’re definitely in it for the long term and so is he. I had a beautiful conversation with him. He’s all ready to go. And I think you’ll see a different Hardik Pandya and a very experienced Hardik Pandya coming to the fore.
“And he’s very keen to share his experience and his wisdom with us. It will strengthen our core group and will be a big support, to Shreyas on the field and Ricky and everyone off the field,” Wadia said.
Punjab Kings and Mumbai Indians roughly took a month to close the trade with Arshdeep Singh going to the five-time champions in return.
Wadia said Hardik adds immensely to the franchise both as a player and as a brand.
“He’s got a lot of followers. He’s an icon. He brings a lot, his experience, you know, more than anything. It’s something like I said, Mumbai will benefit from Arshdeep and we will benefit from Hardik. It is the biggest trade in IPL history,” said the industrialist.
#IPL #HardikPandya #PBKS
(Full video available on PTI Videos – https://t.co/bIyFWTeOLF)
— Press Trust of India (@PTI_News) November 12, 2026
हार्दिक आणि श्रेयस यांचे संबंध चांगले असल्याचे सांगताना वाडिया म्हणाले की, दोघांमध्ये समन्वयाचा प्रश्न निर्माण होणार नाही. गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देणारा हार्दिक जागतिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू असून त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल. हार्दिकच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींचाही व्यवहारापूर्वी विचार केल्याचे वाडिया यांनी मान्य केले. मात्र, तो लढाऊ खेळाडू असून भविष्यात तंदुरुस्त राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
अर्शदीप सिंगबद्दल वाडिया काय म्हणाले?
How important will Hardik Pandya be for Punjab Kings? 🤔
Co-owner Ness Wadia opens up in a chat with Cricbuzz…
#IPL2027 #PunjabKings https://t.co/FF14ayuYRD
— Cricbuzz (@cricbuzz) November 12, 2026
दरम्यान, आठ वर्षे पंजाबकडून खेळलेल्या अर्शदीपला सोडणे कठीण होते, अशी भावना वाडियांनी व्यक्त केली. भविष्यात त्याच्या पुनरागमनाचे दरवाजे खुले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंजाबकडे युझवेंद्र चहल, मार्को यान्सेन, अजमतुल्ला ओमरझाई आणि हरप्रीत ब्रार यांसारखे पर्याय असल्याने गोलंदाजीची चिंता नसल्याचे वाडिया म्हणाले. आगामी हंगामात विजेतेपद मिळवण्याच्या दिशेने संघाची बांधणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.





