Cricketer of the Year : ना पांड्या, ना सूर्या ‘या’ खेळाडूला आयसीसी कडून 2024 चा टी-ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड जाहीर

मुंबई : आज आयसीसी कडून 2024 चा बेस्ट टी-ट्वेंटी संघ जाहीर केला. या संघात रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना स्थान देण्यात आले. विशेष म्हणजे या संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. अर्शदीप सिंगला संघात स्थान देण्यात आले तसेच त्याला ICC कडून 2024 चा टी-ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्डदेखील जाहीर करण्यात आला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंगने इतिहास रचला होता. अर्शदीपने युझी चहलचा रेकॉर्ड मोडून भारतासाठी टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. अर्शदीप सिंगच्या या कामगिरीची दखल आता आयसीसीने देखील घेतली. आयसीसीने अर्शदीप सिंग याला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठं गिफ्ट दिलं आहे.
आयसीसीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयरची घोषणा केली. गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंगला हा सन्मान मिळाला आहे. अर्शदीप सिंगने ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड, पाकिस्तानचा बाबर आझम आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांना मागे टाकून आयसीसी टी-ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयरचा सन्मान मिळवला आहे.





