नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस ने NEET PG परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नीट पीजी परीक्षा 11 ऑगस्ट 2024 ला दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थी नीट पीजी परीक्षेचं नवं वेळापत्रक एनबीईची वेबसाईट natboard.edu.in वर पाहू शकता. नीट पीजी परीक्षा ही नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकार, नेट परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या नोटीसनुसार नीट पीजी परीक्षेचं आयोजन 11 ऑगस्टला होणार आहे. ही परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे. यानंतर या परीक्षेची कट ऑफ डेट 15 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. वेळापत्रक पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा स्टेप 1: सर्वप्रथम नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या अधिकृत वेबसाईटला natboard.edu.in भेट द्या. स्टेप 2: आता नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या होमपेज वर तुम्हाला पब्लिक नोटीस ऑप्शन दिसेल. स्टेप 3: पब्लिक नोटीस मध्ये तुम्हाला नीट पीजी परीक्षेसंदर्भातील पर्याय दिसेल. स्टेप 4: विद्यार्थी त्यावर क्लिक करु शकतात. स्टेप 5: यानंतर विद्यार्थ्यांना नवं पेज उघडलेलं पाहायला मिळेलं. स्टेप 6: यानंतर विद्यार्थ्यांना नीट पीजी परीक्षेबाबत सूचनापत्रक पाहायला मिळेल.