नीट परीक्षा घोटाळा प्रकरण: आरोपी संजय जाधवला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

NEET Exam Scam| नीट पेपर फुटी प्रकरणात सातत्याने नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील फरार आरोपी शिक्षक संजय तुकाराम जाधव याला या प्रकरणातील आरोपी संजय जाधव याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संजय जाधव यांची सध्या चौकशी करण्यात आली. पेपर फुटी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी एन. एन. चव्हाण यांनी त्याला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी संजय जाधव याला मंगळवारी लातूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं., दरम्यान न्यायालयाने आरोपी संजय जाधव याला सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नीटच्या पेपरफुटीत सहभाग असल्याच्या संशयावरुन नांदेड येथील एटीएस पथकाने २२ जून रोजी जलील उमरखा पठाण व संजय जाधव यांची चौकशी केली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून दिले होते. या प्रकरणातील या दोन आरोपींसह उमरगा येथील इरान्ना कोनगलवार यांचे एकूण सहा मोबाईल पोलिसांनी जप्त केले.
त्यात नीटच्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीट, विद्यार्थ्यांशी व्हॉट्सअॅपवर त्यांनी केलेली चॅटिंग, आर्थिक व्यवहार संबंधीची माहिती आढळली. संजय जाधव हा इच्छुक विद्यार्थी किंवा त्यांचे पालक हेरायचा त्यांच्याकडून पैसे घेऊन तो इरन्ना कोनगलवारकडे पाठवायचा अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
देशात सध्या गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर आलं. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक जलील पठाण आणि संजय जाधव इतर दोन अशा एकूण चार आरोपींची नावं समोर आली होती. जलील पठाणला रविवारी पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी कोर्टासमोर हजर केलं असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. संजय जाधव या जिल्हापरिषदेच्या शिक्षकाचा शोध सुरू होता. पोलिसांनी संजय जाधवला अटक करून त्याला 2 २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.





