NEET Exam: सुरक्षेसाठी थेट लष्कराची मदत! ५६५ शहरांमध्ये २२ लाखांहून अधिक विद्यार्थी सज्ज
NEET Exam: ३ मे रोजी झालेल्या पेपरफुटीच्या गैरप्रकारानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आज संपूर्ण देशात पारदर्शक वातावरणात परीक्षा.

NEET Exam – नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) रविवार, दि. २१ जून रोजी वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट परीक्षा पुन्हा घेतली जात आहे. दि. ३ मे रोजी झालेल्या पेपरफुटीच्या गैरप्रकारानंतर केंद्र जुनी परीक्षा रद्द केली होती. या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता, तर कॉक्रोच जनता पार्टीने शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
मात्र, आता हा सर्व भूतकाळ मागे सारून प्रशासन आणि विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत. देशातील ५५१ शहरे आणि परदेशातील १४ शहरांमध्ये नीट परीक्षा पुन्हा होणार आहे. या परीक्षेला तब्बल २२ लाख ७९ लाख विद्यार्थी बसणार आहेत. यावेळेस परीक्षा संपूर्ण पारदर्शक व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्राने चक्क लष्कराची मदत घेतली असून सर्व परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान, आजूबाजूला काय घडले याने मन विचलित होऊ देऊ नका. ही परीक्षा म्हणजेच सर्वस्व नाही, तर जीवनातील केवळ एक संधी आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आणि स्वतःला न्याय देण्याच्या विचाराने या परीक्षेला सामोरे जावे, असा सल्ला शिक्षण तज्ज्ञांनी दिला आहे.
वेळेत पोहचणे आवश्यक
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी ११:०० ते दुपारी १:३० या वेळेत पोहोचणे बंधनकारक आहे. या वेळेत विद्यार्थ्यांची सुरक्षा तपासणी केली जाते. परीक्षा केंद्राचे दरवाजे दुपारी १:३० वाजता बंद केले जातात. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात नाही. दुपारी १:४५ वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली जाते आणि दुपारी १:५० वाजता त्यांना उत्तरपत्रिकांवर तपशील भरण्याची परवानगी असते. दुपारी ठीक २:०० वाजता प्रत्यक्ष परीक्षा सुरू होते. संध्याकाळी ५:१५ वाजता परीक्षा संपणार आहे.





