Manisha Mandhare arrested: नीट-यूजी २०२६ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए)च्या पेपरसेटिंग समितीवर कार्यरत असलेल्या जीवशास्त्राच्या व्याख्यात्या मनीषा मांढरे यांना शनिवारी अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि इतर आरोपींकडून झालेल्या चौकशीतून मांढरे यांचे नाव समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीबीआय मुख्यालयात चौकशी केल्यानंतर मांढरे यांना अटक करण्यात आली. त्या एनटीएकडून नीट-यूजी परीक्षेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आल्या होत्या. वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांवर त्यांना पूर्ण प्रवेश होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एप्रिल २०२६ मध्ये मांढरे यांनी पुण्यातील मनीषा वाघमारे हिच्या माध्यमातून संभाव्य उमेदवारांना संपर्क साधल्याचा आरोप आहे. वाघमारे हिला सीबीआयने १४ मे रोजी अटक केली होती. मांढरे यांनी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी विशेष शिकवणी वर्ग घेतल्याचा आरोप असून, या वर्गांमध्ये निवडक विद्यार्थ्यांना फुटलेले प्रश्न आणि उत्तरे सांगितली जात होती. त्यासाठी लाखो रुपये घेतल्याचेही तपासात समोर आले आहे. (Manisha Mandhare arrested) या वर्गांमध्ये सांगण्यात आलेले बहुतांश प्रश्न ३ मे रोजी झालेल्या प्रत्यक्ष नीट-यूजी परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. पेपरफुटीच्या आरोपांनंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. (Manisha Mandhare arrested) Manisha Mandhare arrested: नीट पेपरफुटीप्रकरणी मनीषा मांढरे यांना अटक, विद्यार्थ्यांना सांगितले होते प्रश्न यापूर्वी सीबीआयने लातूर येथील रसायनशास्त्राचे तज्ज्ञ प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांना शुक्रवारी अटक केली होती. कुलकर्णी अनेक वर्षे नीट प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समित्यांमध्ये कार्यरत होते. गोपनीय माहितीचा गैरवापर करून त्यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी खास शिकवणी वर्ग घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न, पर्याय आणि उत्तरे लिहून घेण्यास सांगण्यात आले होते. हेच प्रश्न आणि उत्तरे प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. Manisha Mandhare arrested नीट-यूजी परीक्षा ३ मे रोजी देशातील ५५१ शहरांमध्ये तसेच परदेशातील १४ केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ७ मेच्या संध्याकाळी गैरप्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय यंत्रणांकडे तपासासाठी प्रकरण सोपविण्यात आल्याचे एनटीएने म्हटले आहे.