Neeraj Javelin Silver : ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोप्राचा ‘सिल्व्हर’ धमाका! दुखापतीतून सावरत ८५.८३ मीटरवर फेकला भाला
Neeraj Javelin Silver : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेक प्रकारात ८५.८३ मीटर थ्रो करत रौप्यपदक पटकावले आहे.

Neeraj Chopra Wins Silver Medal Javelin Throw Glasgow CWG 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Glasgow CWG 2026) भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने पुरुषांच्या भालाफेक प्रकारात ८५.८३ मीटर थ्रो करत रौप्यपदक (Silver Medal) पटकावले आहे. शुक्रवार, ३१ जुलै २०२६ रोजी स्कॉटस्टाउन स्टेडियमवर झालेल्या या ऐतिहासिक आणि अटीतटीच्या सामन्यात प्रचंड थंडी आणि वेगवान वाऱ्याचे आव्हान होते. कंबरेच्या दुखापतीतून सावरत २८ वर्षीय नीरजने या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
श्रीलंकेच्या पथिरागेला सुवर्ण; यश वीर सिंहला कांस्य!
या शर्यतीत श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिरागेने ८९.७५ मीटरचा अवाढव्य थ्रो करत सुवर्णपदकावर (Gold Medal) कब्जा केला. नीरजने दुसऱ्या स्थानावर राहत रौप्य जिंकले, तर भारताच्याच यश वीर सिंहने ८५.४१ मीटर अंतरावर भाला फेकत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावून देशाची मान उंचावली.
A double podium finish to remember! 🥈🥉🇮🇳
Congratulations to Neeraj Chopra for winning Silver and Yash Vir Singh for securing Bronze in the Men’s Javelin Throw at the Commonwealth Games.
Two Indians finishing on the podium is a historic first for this event. This is a truly… pic.twitter.com/QmqnW2VJT1
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 31, 2026
भारताचा रोहित यादव (८१.५६ मी) सातव्या, तर पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अरशद नदीम (७७.४१ मी) नवव्या स्थानावर राहिला. २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता, त्यामुळे २०१८ च्या गोल्ड कोस्ट मधील सुवर्णपदकानंतरचे राष्ट्रकुलमधील हे त्याचे दुसरे पदक आहे.
“माझ्या शरीरात भारतीय रक्त आहे, त्यामुळे…”
A landmark day for Indian javelin. 🇮🇳💪
Neeraj Chopra shares his thoughts on India’s double podium finish in javelin, the drive to keep getting better and the emergence of the next generation. 🗣️ pic.twitter.com/2EMV2AaK59
— Olympic Khel ™ (@OlympicKhel) July 31, 2026
रौप्यपदक जिंकल्यानंतरही नीरज आपल्या फिटनेसबाबत पूर्ण समाधानी नव्हता. तो म्हणाला, “मी अजून १०० टक्के फिट नाही, मी हळूहळू लय पकडत आहे. दुखापतीतून आल्यावर प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते, त्यामुळे मी थ्रो करताना सावधगिरी बाळगत होतो. जर तुम्ही पूर्ण फिट असाल, तर मैदानात लढण्याचा आत्मविश्वास वेगळा असतो.”
ग्लास्गोच्या गोठवणाऱ्या थंडीबाबत नीरज मिश्कीलपणे म्हणाला, “माझ्यासाठी थंडीत चांगली कामगिरी करणे सोपे नसते. मला गरम हवामान जास्त आवडते, कारण माझ्या शरीरात भारतीय रक्त आहे!” रौप्य पदकावर न थांबता आगामी स्पर्धांमध्ये अजून सुधारणा करण्याचा निर्धार नीरजने व्यक्त केला.





