Neera News : सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याचा नीरा येथे तीव्र निषेध

प्रभात वृत्तसेवा
नीरा – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नीरा येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत निषेध नोंदवला.यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे म्हणाले, “सरन्यायाधीश हे देशाच्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च पद आहे. हा हल्ला देशाच्या सन्मानावर आघात आहे. हल्लेखोरावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे, माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण, सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव, माजी उपासरपंच किरण मोरे, समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेश चव्हाण, बौद्ध महासभेचे दादासाहेब गायकवाड, ॲड. आदेश गिरमे, ॲड. पृथ्वीराज चव्हाण, सूर्यकांत कांबळे, सिकंदर शेख, दयानंद चव्हाण, सुरेंद्र जेधे, प्रकाश कदम, अनिल मसने, सचिन मोरे, अमोल साबळे यांचा समावेश होता. यावेळी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने निषेध सभेत सहभागी झाले होते. रिपाइंच्या वतीने स्वप्निल कांबळे, अमोल साबळे यांनी नीरा पोलीस ठाण्याचे प्रभारी फौजदार सर्जेराव पुजारी यांना निवेदन दिले.





