अहमदनगर – कुकाणा येथे फटाक्यांची अतिषबाजी करत लाडू वाटप
Updated On:

नेवासा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळविल्याबद्दल भारतीय जनता पार्टी नेवासा तालुक्याच्यावतीने कुकाणा येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात लाडू वाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विधानसभा प्रमुख व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, चंपू बोरा, शरद जाधव, भारत गुंजाळ, रितेश भंडारी, अण्णासाहेब गव्हाणे, पांडुरंग कावरे, अप्पासाहेब कावरे, सागर खोसे, अरुण गरड, पडुळे मामा, बाळासाहेब क्षीरसागर, दत्तात्रय लांघे, शहाजी गढेकर, नारायण काळे, पंचायत राज जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





