NCP Symbol Hearing : तारीख पे तारीख ! ‘घड्याळा’चा फैसला नवीन वर्षातच होणार, न्यायालयाने काय सांगितलं पाहा…

Ajit Pawar | Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सर्वांना पाहायला मिळाला. बंडखोरीनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस ‘पक्ष’ आणि ‘घड्याळ’ या पक्षचिन्हावर दावा केला. त्यानंतर शरद पवार गटाकडून देखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि ‘घड्याळ’ चिन्हासंबंधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेलीय. द्विसदस्यीय खंडपीठापुढे हे प्रकरण सूचिबद्ध करण्यात आलं होतं. मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर पुढील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव व ‘घड्याळ’ चिन्हाचा फैसला आता नवीन वर्षात होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे पक्षाचे चिन्ह अजित पवार यांना देण्यात आले होते.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने फेब्रुवारी 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
या याचिकेवर मागील दहा महिने ‘तारीख पे तारीख’ सुरु आहे. मंगळवारीही सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले होते. मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता ही 7 जानेवारी 2025 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.





