PMPML दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अनोख्या पद्धतीने निषेध; थेट पालिका आवारतच घोडे, बैल अन्…

Pune News : १ जून २०२५ पासून पुणे महानगर प्रदेश परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीएमएलने नवी दरवाढ लागू केली असून, यामुळे तिकिटांचे दर वाढले आहेत. परिणामी पुण्यात पीएमपीएमएलच्या बसचा प्रवास महागला आहे. पुणेकरांनी ही लागू केलेली नवी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. अशातच दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने महापालिका आवारात अनोखे अंदोलन करून याचा निषेध नोंदविण्यात आला.
जे लोकं रोजंदारीवर काम करून पैसे कमतात, त्यांना या दरवाढीची मोठी झळ बसली आहे. यामुळे शहरात सायकल टांग्याने वा बैलगाडीने फेरावे असा प्रश्न निर्माण झाल्याचे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाच्या वतीने पुणे महापालिकेबाहेर दरवाढी विरोधात निषेध नोंदविण्यात आला. महापालिकेच्या आवारात बैलगाडी, सायकल घोडोे दाखल झाले होती. या अनोख्या अंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा आहे.
पुणेकरांना ही नवी तिकीट दरवाढ परडवणारी नाही. पुणे हे पूर्वी सायकलींचे शहर होते, त्यानंतर ते टांग्याचे शहर झाले. इतकी मोठी तिकीट दरवाढ केल्याने पुणेकरांवर टांग्यात फिरावे की सायकल चालवावी असा प्रश्न त्यांनी सरकारला केला आहे. यावेळी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल करत दरवाढ करून पुन्हा घोडेस्वारीचा काळ आणला असल्याची टीका केली.
बैलगाडीतून पालिका आवारात
महिला पदाधिकाऱ्यांनी देखील दरवाढीबाबत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. यावेळी महिला पदाधिकारी बैलगाडीत बसून महापालिका आवारात दाखल झाल्या होत्या. ही दरवाढ रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.





