NCP Protest: महापालिकेत राष्ट्रवादी आक्रमक! नगरसेवकांचा निधी शून्य केल्यावरून भाजपविरोधात घोषणाबाजी
NCP Protest:

NCP Protest – भाजपकडून राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा अंदाजपत्रकातील निधी शून्य करण्यात आल्यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुक्रवारी महापालिकेत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात,
पक्षाचे गटनेते निलेश निकम यांच्यासह पक्षाचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर नगरसेवकांच्या वतीने स्थायी समितीत मंजूर करण्यात आलेल्या बेकायदेशीर वर्गीकरणाचे प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी रद्द करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आम्ही तसे वागणार नाही
या वेळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याचे पडसाद राज्यभर उमटतील, असा इशाला दिला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा निधी वळविल्याने विकासकामांवर परिणाम होणार आहे. नागरिकांना वेठीस धरले जात आहे. भाजप मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर झालेल्या आरोपांचा दाखला देत असली,
तरी यापूर्वीही भाजपने स्वर्गीय अजित पवारांवर आरोप केले. मात्र, आम्ही पालिकेत सत्तेत असताना कधीही भाजपच्या नगरसेवकांचा निधी कापला नाही. आता आमच्याकडे डीपीडीसी आणि जिल्हा परिषद असली, तरी आम्ही अशा प्रकारे वर्तणूक करणार नाही, असेही टिंगरे या वेळी म्हणाले.





