राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अस्थिर; ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थीर असून त्यांच्यावर पुढील तीन दिवस उपचार करण्यात येणार आहे. यानंतर 2 नोव्हेंबरला डिस्चार्ज मिळणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आजपासून 2 नोव्हेंबरपर्यंत शरद पवार हे हॉस्पिटलमध्ये असणार आहे. 2 नोव्हेंबरला संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर 3 तारखेला शरद पवार हे शिर्डी येथील नियोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. 4 ते 5 नोव्हेंबर रोजी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्याला ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी करू नये, अशी विनंती राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, गतवर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्यावर खासगी रुग्णालयात पित्ताशयावर शस्रक्रिया करण्यात आली होती. तसेच तोंडातील व्रण काढण्यासाठी वैद्यकीय प्रक्रियाही करण्यात आली होती.





