BREAKING NEWS ! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार रुग्णालयात दाखल झाले असलयाचे समजते. आगामी काही दिवसांतील त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आलॆ आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले.
प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढील ३ दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना ऍडमिट केल्याचे समजते. 2 नोव्हेंबर रोजी त्यांना संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाने पत्रक काढून दिली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी पवार शिर्डीत येणार आहेत. तसेच 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पक्षाच्या दोन दिवसीय शिबीराला मार्गदर्शन करतील असेही राष्ट्रवादीच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढील तीन दिवस पवार साहेबांना मुंबईतील ब्रीज कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. #NCP pic.twitter.com/YpjqjcFw1E
— NCP (@NCPspeaks) October 31, 2022
पक्षातील कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये असे आवाहन देखील पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. मात्र पवारांना नेमका कशाचा त्रास सुरु झाला आणि ते कशासाठी उपचार घेणार आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.





