भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चेवर अमोल कोल्हे म्हणतात,’..वापर कसा होतो यांचं मी उदाहरण दिलं होतं’

मुंबई – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अमोल कोल्हे पक्ष्याच्या कार्यक्रमांना आणि बैठकांना देखील महिन्याभरापासून दांडी मारत आहेत. तर, दुसरीकडे मतदार संघातील नागरिक सुद्धा कोल्हेंवर नाराज असल्याचं दिसून आलं आहे. तर, काही दिवसांपूर्वी भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. यात अमोल कोल्हेंच्या कथित नाराजीवर भाष्य करण्यात आलं.
अशातच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिट्टी फुंकत त्यांचे घनिष्ठ मित्र आणि महाविकासआघाडीचे बंडकोर नेते राहुल कलाटे यांचाच अप्रत्यक्षपणे प्रचार केल्याची चर्चा रंगली. या सर्व चर्चांवर आता थेट अमोल कोल्हे यांनीच भाष्य केलं.
अमोल कोल्हे म्हणाले, “मी केलेलं भाषण सार्वजनिक मंचावर आहे. नागपूरमध्ये शिवशाही महोत्सवात संविधान जागर या विषयावर बोलताना कोणत्याही कायद्याचा वापर कसा होतो यांचं मी उदाहरण दिलं होतं. ते भाषण एडिट करून माझ्या ‘क्लिप्स’ तयार करण्यात आल्या. त्यामुळे त्याचा अन्वयार्थ काढणं योग्य नाही.”
तत्पूर्वीही, या सर्व राजकीय घडामोडीनंतर आत स्वतः अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, ‘लोकशाहीमध्ये राजकारणाचा पोत बदलत चालला आहे. संसदेतील माझ्या भाषणनंतर पण अजूनही हा प्रश्न लोकांना पडत आहेत. जर तसं असेल तर लोकांनी माझे संसदेतील पूर्ण भाषण ऐकावं. माझ्या संसदेच्या भाषणात ‘कभी खुशी कभी गम’ आहे का? हे तुम्हाला कळेल, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.





