राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर

कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेही लवकरच करणार पक्षप्रवेश

सोलापूर (प्रतिनिधी) – कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि मोहोळचे नागनाथ क्षीरसागर यांचा 27 ऑगस्ट, तर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांचा 31 ऑगस्टपर्यंत शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने सहा प्रमुख मतदारसंघात रणनीती आखायला सुरुवात केली आहे. करमाळ्यातील राष्ट्रवादी नेत्या रश्‍मी बागल यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्ष सोडण्याची तयारी दाखविली आहे. कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी माने यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा सल्ला दिला.

गेल्या 15 दिवसांत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्याकडे गणेश वानकर, दिलीप माने, नागनाथ क्षीरसागर यांच्या बैठका झाल्या. या बैठकीनंतर माने यांनी कॉंग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. माने आणि क्षीरसागर यांचा एकाच दिवशी प्रवेश होईल.

दरम्यान, आमदार दिलीप सोपल यांचा प्रवेश 31 ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र सोपलांसोबत शिवसेनेच्या नेत्यांची आणखी एक चर्चेची फेरी होणार आहे. या फेरीनंतरच सोपलांच्या सेना प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल, असेही नेत्याने सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×