Sansad ratna award : खासदार सुप्रिया सुळेंना सलग 7व्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार चेन्नईच्या प्राईम पॉईंट फाउंडेशनकडून दिला जातो. सुप्रिया सुळे यांच्यासह महाराषट्रातील चार खासदारांना हा पुरस्कार मिळाला आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपच्या हीना गावित यांना देखील संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. तर देशातील 11 खासदारांना हा पुरस्कार मिळाला आहे. कामगिरीतल्या सातत्याबद्दल सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना “संसद विशिष्ट रत्न’ पुरस्कार असणार आहे. याबाबतची माहिती फाउंडेशनकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, यंदा एकूण 11 जणांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. यंदा ज्या अकरा जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यामधे महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश आहे तर रिव्हॉलुशनरी सोशलिस्ट पक्षाचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन, तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय, काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा आणि भाजपचे खासदार विद्युत बरान महातो, सुधीर गुप्ता राज्यसभेतील बिजू जनता दलाचे खासदार अमर पटनायक, कम्युनिट पार्टीचे खासदार के. के. रागेश यांचा देखील समावेश आहे.





