Heena Gavit : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दुरावलेले नेत्यांना जवळ केले जात असून यामुळे पुन्हा हे नेते ‘स्व’गृही परतत आहेत. भाजपच्या लोटस अॅापरेशनला मोठे यश मिळताना दिसत आहे. भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग वाढले आहे, अशातच आता नंदुरबारमधील राजकारणात गावित कुटुंबाचा दबादबा असून, याच कुटुंबातील माजी खासदार हिना गावित स्वगृही येणार आहेत. आज त्यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजप पक्ष प्रवेश पार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने नंदुरबारमधील ही मोठी राजकीय घडामोडी मानली जात आहे. यामुळे आता नंदुरबारमध्ये भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर हिना गावित या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, ज्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आता त्यांच्यासाठी पक्षाने दारे खुले केली आहेत. हेही वाचा : लोणंदमध्ये २२ वर्षीय युवकाचा गळा आवळून खून; संशयिताचा शोध सुरू विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अक्कलकुवा अक्राणी विधानसभेतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आज त्या त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये अर्थात स्वर्गही येणार आहेत. त्यांच्या घरवापसीमुळे नंदरबार येथील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबारचे विद्यमान आमदार डॅाक्टर विजयकुमार गावित यांच्या त्या कन्या आहेत. गावित कुटुंबाचे राजकीय वजन लक्षात घेऊन… नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात भाजप पक्षाला मोठं करण्यात गावित कुटुंबाचे मोठं योगदान असल्याचे सांगितले जाते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि उत्तर महाराष्ट्रातील गावित कुटुंबाचे राजकीय वजन लक्षात घेऊन त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आल्याची चर्चा आहे. हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; खासदार उदयनराजे यांचं थेट आव्हान, जोरदार प्रत्युत्तर देत म्हणाले “आधी…”