शिंदे सरकार कोसळणार आणि लवकरच मध्यवती निवडणुका होणार – जयंत पाटील

मुंबई – राज्यात मध्यवती निवडणुका होणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणार आणि मग मध्यावती निवडणुका लागतील असे त्यांनी म्हंटले आहे. मध्यवती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसची किती तयारी आहे या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे. तसेच मध्यवती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसची संपूर्ण तयारी असल्याचेही त्यांनी म्हंटले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, मध्यावधी निवडणुका लागल्या तर भाजप आणि शिंदे गटाला ते तितकंस सोपं जाणार नाही. लोकांना स्वज्वळ, प्रामणिक मुख्यमंत्री पाहायची सवय लागली आहे. जनतेचा सध्या अपेक्षा भंग झाला आहे. पाच वर्ष आम्ही सक्षम विरोधीपक्षाची भूमिका बजावतो. 2024 ला पुन्हा निवडणूक लढतो आणि पुन्हा सत्तेत येतो, असे भाजपने म्हटले असते तरी लोकांनी त्यांना स्विकारले असते पण आता महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिंदे गटाला सोबत घेत सत्ता बसलेलं लोकांना पटलेलं नाही. त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील.
दरम्यान, अडीच वर्ष महाविकास आघाडी सत्तेत राहिल्यानंतर शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदार आणि भाजप यांनी सत्ता स्थापन केली. सत्तेतून पायउतार झालेल्या महाविकास आघाडीकडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारव टीका केली जात आहे. शिवसेना पक्षातील दोन्ही गटातील नेत्यांचा वाद तर टोकाला पोहोचत आहे. दोन्ही गटातील नेते दररोज एकमेकांवर विविध आरोप करताना दिसत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी मध्यावती निवडणुकीसाठी तयार असल्याचे सातत्याने सांगितले जात असून भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून 2024ला पाहू असे सांगितले जात आहे.





