अजित पवारांकडून राष्ट्रवादीचे नवे प्रचारगीत लॉंच

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन सन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातून या जन सन्मान यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने अजित पवारांकडून संपूर्ण महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. माझी लाडकी बहीण योजना या सह राज्य सरकारच्या विविध योजनांची ब्रॅण्डिंग या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यादरम्यान अजित पवारांकडून राष्ट्रवादीचे नवे प्रचारगीत लॉंच करण्यात आले आहे. काम करत आलोय, काम करत राहू अशी टॅगलाईन या गाण्यातून स्पष्ट करण्यात आली आहे.
गीत राष्ट्रवादी, सन्मान महाराष्ट्रवादी!
आलंय राष्ट्रवादीचं नवं गाणं!#जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra pic.twitter.com/rf9AAwKLup— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 8, 2024
काय आहे नवीन गाण्यात?
काम करत आलोय… काम करत राहू… अशी अजित पवारांची नवीन टॅगलाईन आहे. तर गीत राष्ट्रवादी, सन्मान महाराष्ट्रवादी असं हे गाणं आहे. राष्ट्रवादीच्या नव्या गाण्याचा व्हिडीओ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. काम करत आहे, काम करत राहू असं म्हणत राज्य सरकारच्या योजनांचा उल्लेख या गाण्यात करण्यात आला आहे.
अजित पवार जात असताना या यात्रेच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करणार आहेत. अजित पवार नाशिकमध्ये दाखल झाले असून ते पिंक बसमधून रवाना झाले. अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी एकाच सीटवर बसून प्रवास केला. अजित पवारांच्या या बदललेल्या अंदाजाचा येणाऱ्या निवडणुकीत किती फायदा होतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





