छत्तीसगडमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार
Updated On:

रायपूर : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला. ही चकमक जिल्हा राखीव दलाचे जवान येथील जंगलात शोधमोहीम राबवत असताना घडली. ही कारवाई डीआरजी, सीआरपीएफ, एसटीएफ यांच्या कोब्रा बटालयीनने केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जवानांकडून जंगालात शोधमोहीम राबवली जात असताना परिसरात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. ज्याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा झाला.
त्याचा मृतदेह देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे. याचबरोबर घटनास्थळावरून शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या चकमकीनंतर आसपासच्या परिसरात जवानांची शोधमोहीम सुरूच होती.





