छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक ; 9 नक्षलवादी ठार, एक जवान जखमी

Naxal Encounter । छत्तीसगडमधील अबुझमदमध्ये सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे वृत्त आहे. या चकमकीत 9 नक्षलवादी ठार झाले आहेत. तर एक जवान गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
३ महिला अन् ६ पुरुष नक्षलवादी ठार Naxal Encounter ।
छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनीही अबुझमद, नारायणपूर येथे झालेल्या चकमकीत ९ नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी केली आहे. माहिती देताना ते म्हणाले की, “नारायणपूरपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या अबुझमदमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईदरम्यान चकमकीत ३ महिला नक्षलवादी आणि ६ पुरुष नक्षलवादी ठार झाले. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आमचे सर्व सैनिक पूर्णपणे सुरक्षित आहेत, त्याबद्दल सैनिकांचे अभिनंदन.”
मिळालेल्या माहितीनुसार, अबुझमदच्या जंगलात डीआरजी आणि एसटीएफ उपस्थित होते. दोन्ही बाजूंनी जोरदार चकमक झाली. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज आणि एसपी प्रभात कुमारही चकमकीवर लक्ष ठेवून होते. यापूर्वी छत्तीसगडमधील सलातोंग भागात जिल्हा राखीव रक्षक (DRG) जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती.
काही नक्षलवाद्यांना गोळ्या लागल्या Naxal Encounter ।
मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत काही नक्षलवाद्यांना गोळ्या लागल्या आहेत. डीआरजीचे जवान शोध मोहिमेवर गेले असताना ही चकमक सुरू झाली. या चकमकीला दुजोरा देताना एसपी किरण चव्हाण म्हणाले की, सुकमा जिल्ह्यातील किस्टाराम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेसलपाड आणि आसपासच्या जंगल टेकड्यांमध्ये किस्टाराम एरिया कमिटीचे माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती.
माहितीवरून डीआरजी, बस्तर फायटर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियनचे संयुक्त पथक गस्तीवर पाठवण्यात आले. या कारवाईदरम्यान पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. घटनास्थळाची कसून झडती घेतल्यानंतर तेथून शस्त्रे आणि इतर नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले. मृत नक्षलवाद्याच्या मृतदेहाची ओळख पटवली जात असल्याचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले. या भागात सुरक्षा दलांची शोधमोहीम अजूनही सुरू आहे.





